5 वी विज्ञान

 पाचवी विज्ञान खेळ, कोडी, प्रयोग, उपक्रम 

तुम्हाला खेळ, कोडी, प्रयोग, उपक्रम पैकी काय काय आवडले comments मध्ये तुमच्या नावासह लिहा

अनुक्रमणिका
१. आपली पृथ्वी-आपली सूर्यमाला. २. पृथ्वीचे फिरणे.. ३. पृथ्वी आणि जीवसृष्टी.. ४. पर्यावरणाचे संतुलन.. ५. कुटुंबातील मूल्ये. ६. नियम सर्वांसाठी. ७. आपणच सोडवू आपले प्रश्न.. ८. सार्वजनिक सुविधा आणि माझी शाळा. ९. नकाशा : आपला सोबती. १०. ओळख भारताची. ११. आपले घर व पर्यावरण. १२. सर्वांसाठी अन्न.. १३. अन्न टिकवण्याच्या पद्धती. १४. वाहतूक. १५. संदेशवहन व प्रसार माध्यमे. १६. पाणी. १७. वस्त्र- आपली गरज. १८. पर्यावरण आणि आपण. १९. अन्नघटक. २०. आपले भावनिक जग. २१. कामांत व्यस्त आपली आंतरेंद्रिये. २२. वाढ आणि व्यक्तिमत्व विकास... २३. संसर्गजन्य रोग आणि रोगप्रतिबंध.२४. पदार्थ, वस्तू आणि ऊर्जा

पृथ्वी आणि जीवसृष्टी 

“मी कोण” ?
(चित्रातीर भूरुपात या प्रश्नांची उत्तरे आहेत ते

1.  मी खूप उंच आहे खडकांपासून बनलेला आहे आणि चढाईसाठी प्रसिद्ध आहे आणि कधी माझ्या शिरावर बर्फ असतो.

2.  मी पर्वतापेक्षा लहान आहे. माझ्या सभोवती झाडे आणि रस्ते असतात आणि मी गावांजवळ आढळतो.

3.  माझे भूरूप लहान आणि गोलाकार, माझ्यावर चराईसाठी जनावरांना नेले जाते.

4. मी सपाट आणि विस्तीर्ण आहे. माझ्यावरून नद्या वाहतात आणि माझ्यावर गावे वसवतात. मी शेतीसाठी उपयोगी आहे.

5. मी सपाट पृष्ठ असलेला उंच भाग आहे. माझ्यावर गवत आणि काही झाडे आढळतात.

6.  मी असा भाग आहे जिथे नद्या वाहतात. माझ्या सभोवती डोंगर आणि टेकड्या असतात.

7. मी समुद्र आणि जमिनीच्या मध्ये असलेला किनारा आहे.
माझ्यावरील पसरलेली मऊशार वाळू आणि कडेला नारळाची झाडे असतात.

8. मी समुद्रात असलेला लहान जमिनीचा भाग आहे. माझ्या सभोवती पाणी आहे आणि मी आणि झाडांनी भरलेला आहे.

9. मी नद्या आणि समुद्रातून वाहणारा भाग आहे. माझ्यात राहून तुम्ही माशाशी वैर करू शकत नाही.

10.  मी डोंगरांमध्ये असलेला संकुचित मार्ग आहे, ज्यातून रस्ता जातो. मी पर्वतांमधील खोली आहे, जिथून प्रवाशांना चालता येते. 


पृथ्वीचे फिरणे 

2.1. एकाच वेळी सूर्योदय असणारी गावे...

कोणत्या गावात एकाच क्षणी सूर्योदय होत असतो? 


भारतात अरूणाचल प्रदेशात असणाऱ्या सर्वात पूर्वेकडील गावामध्ये सूर्योदय किती वाजता होतो? डोंग हे ते गाव. येथे सूर्योदय उन्हाळ्यात सकाळी 4:30 ते 5:00 वाजता होतो तर हिवाळ्यात ही वेळ सुमारे 5:00 ते 5:30 वाजता असू शकते.

 भारतात गुजरातमध्ये सर्वात पश्चिमेकडे असणाऱ्या गावात सूर्योदय किती वाजता होतो? गुहा हे ते गाव. भारताच्या पश्चिमेकडील टोकावर आहे . येथे सूर्योदय विशेषतः उन्हाळ्यात साधारणपणे सकाळी 6:30 ते 7:00 वाजता होते, तर हिवाळ्यात ही, सुमारे 7:00 ते 7:30 वाजता असू शकते. एकाच देशात सूर्योदयाच्या वेळात दोन तासांचा फरक पडू शकतो?

दोन वेगवेगळ्या देशांमध्ये सूर्योदय एकाच वेळी होऊ शकतो. खरे नाही वाटत? पृथ्वीचा गोळा घ्या. त्याच्यावर एका बाजूने उजेड पाडा. बाकी बाजू अंधारल्या ठेवा. 

कोणत्या ठिकाणी उजेड आणि अंधार यांची सीमारेषा आहे? 

पूर्वेकडे उजेड आणि पश्चिमेकडे अंधार अशी पट्टी दिसली का? तिथे सूर्योदय होत आहे. 

पृथ्वीचा गोळ्याच्या त्या पट्टीवर कोणती गावे आहेत? ती एकाच देशातील आहेत का?

आणखी कोणत्या ठिकाणी उजेड आणि अंधार यांची सीमारेषा आहे? 

पूर्वेकडे अंधार आणि पश्चिमेकडे उजेड अशी पट्टी दिसली का? तिथे सूर्यास्त होत आहे. 

पृथ्वीचा गोळ्याच्या त्या पट्टीवर कोणती गावे आहेत? ती एकाच देशातील आहेत का?

2.2. एकाच वेळी सूर्यास्त असणारी गावे...

कोणत्या गावात एकाच क्षणी सूर्यास्त असतो? 

भारतातील अरुणाचल प्रदेशातील सर्वात पूर्वेकडील गाव, डोंग, येथे सूर्यास्त उन्हाळ्यात साधारणपणे संध्याकाळी 6:00 ते 6:30 वाजता होतो, तर हिवाळ्यात ही वेळ सुमारे संध्याकाळी 4:30 ते 5:00 वाजता असू शकते.

भारतातील गुजरातमधील सर्वात पश्चिमेकडील गाव, गुहा, भारताच्या पश्चिमेकडील टोकावर आहे. येथे सूर्यास्त विशेषतः उन्हाळ्यात साधारणपणे संध्याकाळी 7:30 ते 8:00 वाजता होतो, तर हिवाळ्यात ही वेळ सुमारे संध्याकाळी 6:00 ते 6:30 वाजता असू शकते.

दोन वेगवेगळ्या देशांमध्ये सूर्योदय एकाच वेळी होऊ शकतो. खरे नाही वाटत? पृथ्वीचा गोळा घ्या. त्याच्यावर एका बाजूने उजेड पाडा. बाकी बाजू अंधारल्या ठेवा. 

कोणत्या ठिकाणी उजेड आणि अंधार यांची सीमारेषा आहे? 

पूर्वेकडे अंधार आणि पश्चिमेकडे उजेड अशी पट्टी दिसली का? तिथे सूर्यास्त होत आहे. 

पृथ्वीचा गोळ्याच्या त्या पट्टीवर कोणती गावे आहेत? ती एकाच देशातील आहेत का?.


2.3. चार दिवस वर्षातले

पृथ्वी वर्षातील चार महत्वाचे दिवस 


तारखा सांगा आणि त्या दिवसाचे वैशिष्ट्य सांगा.

वसंत संपात (Spring Equinox) तारीख: साधारणपणे मार्च 20 किंवा 21

वैशिष्ट्य: या दिवशी जगभरात दिवस आणि रात्र जवळजवळ समान लांबीचे (सुमारे प्रत्येकी 12 तास) असतात. सूर्य समुद्र रेषेवर थेट आहे, ज्यामुळे उत्तरी गोलार्धात वसंत ऋतु (वसंत ऋतू) सुरू होतो आणि दक्षिणी गोलार्धात शरद ऋतु सुरू होतो.

दक्षिण संपात (Summer Solstice) तारीख: साधारणपणे जून 20 किंवा 21

वैशिष्ट्य: हा उत्तरी गोलार्धातील वर्षातील सर्वात लांब दिवस आहे, ज्यामध्ये सर्वात जास्त दिवसप्रकाश असतो. सूर्य आकाशात सर्वोच्च बिंदूवर आहे, थेट कर्कवृत्तावर, ज्यामुळे उत्तरी गोलार्धात ग्रीष्म ऋतु सुरू होतो.

शरद संपात (Autumnal Equinox) तारीख: साधारणपणे सप्टेंबर 22 किंवा 23

वैशिष्ट्य: वसंत संपाता सारखेच, या दिवशी दिवस आणि रात्र जवळजवळ समान लांबीचे असतात. सूर्य पुन्हा समुद्र रेषेवर थेट आहे, ज्यामुळे उत्तरी गोलार्धात शरद ऋतु सुरू होतो आणि दक्षिणी गोलार्धात वसंत ऋतु सुरू होतो.

उत्तर संपात (Winter Solstice) तारीख: साधारणपणे डिसेंबर 21 किंवा 22

वैशिष्ट्य: हा उत्तरी गोलार्धातील वर्षातील सर्वात छोटा दिवस आहे, ज्यामध्ये सर्वात कमी दिवसप्रकाश असतो. सूर्य सर्वात खालच्या बिंदूवर आहे, थेट मकरवृत्तावर, ज्यामुळे उत्तरी गोलार्धात हिवाळा सुरू होतो.

2.4 चंद्राच्या कला तुमच्या हातात 

एक मोठा फुगणारा गोल फुगा घ्या. तो पूर्ण फुगवून त्याचे तोंड दोरीने बंद करा. फुग्यावरती साबणाचे पाणी लावा. त्या फुग्यावरती ओल्या कागदाचे कपटे हळूहळू पूर्णपणे चिकटवा. ओले कपटे वाळू द्या. मग फुग्यातली हवा सोडा आणि फुगा काढून घ्या. वाळलेल्या कागदाच्या गोलाच्या मधून आरपार एक तार किंवा खराट्याची काडी ओवून घ्या. हा आपला चंद्र झाला. भिंतीवर एक दिवा लावा. हा आपला सूर्य झाला. या सूर्याकडे पाठ करून उभे रहा. आपण केलेला चंद्र काडी एका हातात पकडून लांब उभा धरा. आपला चंद्र पूर्ण प्रकाशित दिसेल. ही झाली पौर्णिमा. हात असाच लांब धरून हळूहळू स्वतः भोवती फिरत या चंद्राकडे त्र चंद्राच्या कला म्हणजे प्रकाशित भागाचा आकार बदलताना दिसतो का? हळूहळू फिरत पूर्णपणे आपल्या सूर्याकडे तुमचे तोंड झाले की चंद्र अप्रकाशित दिसेल. ही झाली अमावस्या.

चंद्राच्या कला अशा प्रकारे दिसतील.

1. आपली पृथ्वी आपली सूर्यमाला 

आपली सूर्यमाला या पाटावर आधारित कोडी 

1.1. मी कोण/ आम्ही कोण?



यात सर्व 21 प्रश्नांची उत्तरे आहेत 


1.  मी सूर्यमालेतील सर्वात मोठा आणि गरम गोळा आहे. मी  सगळीकडे प्रकाश आणि उष्णता पाठवतो. मी स्वतःभोवती फिरतो, आणि बाकीचे माझ्याभोवती फिरतात. मी कोण? 

2. मी सूर्याच्या सर्वात जवळ आहे आणि सूर्यमालेत सर्वात छोटा ग्रह आहे. माझ्यावर खूप उष्णता असते, आणि मला चंद्र नाही. मी कोण? 
3. मी पृथ्वीचा शेजारी संध्याकाळी किंवा पहाटे आकाशात चमकतो. माझ्यावर खूप जाड ढग आहेत, ज्यामुळे मी खूप गरम आहे. मी कोण? 

4. माझ्याकडे पाणी, हवा आणि एक चंद्र आहे आणि अब्जावधी जीव आहेत, मी कोण? 
  
5. मी पृथ्वीभोवती फिरतो. रात्रीच्या आकाशात चमकतो. कधी दिवसाही दिसतो. माझ्यामुळे समुद्रात भरती-ओहोटी येते. मी कोण? 

6. माझी माती लाल आहे. माझ्याकडे दोन छोटे चंद्र आहेत, आणि माझ्यावर तुमचे यान आले होते. मी कोण?

7. मी सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह आहे. माझ्याकडे अनेक चंद्र आहेत. माझ्यावर रंगीत ढगांचे पट्टे आहेत. मी कोण? 

8. माझ्याभोवती सुंदर कडी आहेत, ज्यामुळे मी खास दिसतो. मी गॅसचा बनलेला आहे आणि माझ्याकडे अनेक चंद्र आहेत. मी कोण? 
  
9. रंग माझा निळा-हिरवा. मी खूप थंड आहे. मी एका बाजूला तिरका फिरतो, मी कोण? 

10. मी सूर्यापासून खूप दूर आहे आणि गडद निळा आहे. माझ्यावर खूप जोरदार वारे वाहतात. मी सूर्यमालेतील शेवटचा ग्रह आहे. मी कोण? 

11. आम्ही खूप आहोत, आणि सूर्याभोवती फिरत असतो. आमच्याजवळ सर्वात मोठा ग्रह आहे. आम्ही कोण?

12. आम्ही ग्रह नसलो तरी आम्ही आठवड्यात असतो.

13. आम्ही ग्रह असलो तरी आम्ही आठवड्यात नसतो.

14. मी दिसत नाही पण माझ्यामुळे छोट्या गोष्टी मोठ्या गोष्टींकडे ओढल्या जातात.

15. तुम्ही माणसांनी आम्हा पैकी काहींना, चंद्रावर, मंगळावर पोचवले. सूर्याकडे पाठवले आणि सूर्याच्या विरूद्ध दिशेलाही पाठवले. आम्ही कोण?

16. पूर्वी राकेश शर्मा या भारतीय माणसाने अवकाशात उड्डाण केले आणि मीही केले.
17.  आम्ही अवकाशात फिरतो म्हणून तुमचे मोबाईल चालतात.

18. आम्ही इवलेसे‌ आहोत आणि आमच्यामुळे तुम्ही दिवाळीच्या सणात आकाशात रोषणाई करू शकता.

19. आम्ही आकाशात कधीही दिसत नाही तरी तुम्ही सूर्यमालेच्या चित्रात दाखवता.

20. आम्ही आकाशात पडतानाच तुम्ही आम्हाला पहाता.

21. आम्ही आकाशात अचानक दिसायला लागतो आणि सूर्या चक्कर मारून निघून जातो.

1.2. एलियन आला पाहुणा!

मित्रांनो तुमच्याकडे एक अनोखे पाहुणे आले आहेत! ते आपल्या सूर्यमालेतील आहेत असा संशय आहे. त्यांना फक्त हो किंवा नाही अशी मान हलवता येते. त्यांच्याकडे अशी शक्ती आहे की ते आपली भाषा समजू शकतात पण ते आपली भाषा लिहू किंवा वाचू शकत नाहीत. त्यांना आपल्या इथले वातावरण सोसत नाही म्हणून त्यांना एका गोषात ठेवले आहे.

त्यांना १० प्रश्न विचारून ते कोठून आले हे शोधून काढायचे आहे.

तुमच्यापैकी एक कोणीतरी एलियन बना. मनात ठरवा की आपण पृथ्वी सोडून आपल्या सूर्य मालेतील एखाद्या भागातून आलो आहोत. ते ठिकाण कोणते, तेथे वातावरण कसे आहे? त्यामुळे तेथील तुमचे जगणे कसे असेल कल्पना करा. तुमच्या गटातील सोबती तुम्हाला प्रश्न विचारतील त्याची हो किंवा नाही अशी समर्पक उत्तरे द्या. बघू तुमच्या मित्र मैत्रिणींना ओळखता येते का? तुम्ही कोठून आलेले एलियन आहात?


1.3. उपग्रहाची प्रतिकृती

नासा किंवा इस्रोच्या एखाद्या उपग्रहाची माहिती मिळवा. चित्रे पहा. तुम्हाला सहज मिळणाऱ्या कागद कापड काड्या डिंक इत्यादी माध्यमातून त्याची प्रतिकृती तयार करा.  त्यातील प्रत्येक भागाची आणि कार्य  याबद्दल इतरांना कारणासह सांगा

Comments

  1. वर दिलेल्या प्रश्नांची उत्तरे सांग

    ReplyDelete

Post a Comment